Dear Kind Hearts,
My name is Nitin Tatya Kamble, and I am reaching out with a father’s plea to save my little daughter, Tanisha, who is just 7 years old.
Our Journey So Far
When Tanisha was only 5, she was diagnosed with Beta Thalassemia Major, a life-threatening blood disorder. Since then, our lives have been filled with hospital visits, painful treatments, and endless prayers.
Over the past three years, Tanisha has undergone multiple rounds of chemotherapy and continuous medical care. Despite her young age, she has shown remarkable courage in enduring these painful treatments. But as parents, it breaks our hearts every day to see her childhood stolen by hospitals instead of being filled with play and laughter.
The Only Hope – Bone Marrow Transplant
Doctors have now told us that a Bone Marrow Transplant is the only cure that can save Tanisha’s life. This procedure must be done urgently for her to have a chance at living a healthy and normal childhood.
The Financial Struggle
I work in the production department of a manufacturing company. Over the years, I have spent all my savings and taken loans to keep Tanisha’s treatment going. But now, the cost of the Bone Marrow Transplant is far beyond my reach — it will require ₹25,00,000 more.
As a father, I want nothing more than to see my daughter grow up, go to school, run around, and play with her friends like any other child. But without your support, this dream will remain unfulfilled.
🙏 How You Can Help
Your contribution, no matter how small, can bring us closer to saving Tanisha’s life. Every rupee will go directly towards her treatment and give her the chance to live.
Please open your heart and help me bring back my daughter’s smile. Together, we can save her.
Thank you for your kindness and support.
With gratitude,
Nitin Tatya Kamble
(Father of Tanisha)
----------------------------------------------------------------------
प्रिय दयाळू अंत:करण असलेल्यांनो,
माझं नाव नितीन तात्या कांबळे आहे आणि मी एका वडिलांच्या आर्त विनंतीसह आपल्यासमोर आलो आहे. माझ्या लहान मुलीचं नाव तानिशा असून ती फक्त ७ वर्षांची आहे.
आमचा आतापर्यंतचा प्रवास
तानिशा फक्त ५ वर्षांची असताना तिला बीटा थॅलेसेमिया मेजर हा प्राणघातक रक्ताचा विकार असल्याचं निदान झालं. त्या दिवसापासून आमचं आयुष्य रुग्णालयातल्या फेऱ्यांनी, वेदनादायक उपचारांनी आणि अखंड प्रार्थनांनी भरून गेलं आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये तानिशाने अनेक केमोथेरपीचे टप्पे आणि सततची वैद्यकीय काळजी घेतली आहे. एवढ्या लहान वयातही तिने अद्भुत धैर्य दाखवलं आहे. पण आई-वडिल म्हणून आमचं हृदय दररोज तुटतं, कारण तिचं बालपण खेळ-गमतीत न जाता रुग्णालयात जात आहे.
एकमेव आशा – बोन मॅरो ट्रान्सप्लांट
डॉक्टरांनी आता सांगितलं आहे की, बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव उपाय असून त्यानेच तानिशाचं आयुष्य वाचू शकतं. हा उपचार तातडीने करणं अत्यावश्यक आहे, अन्यथा तिला निरोगी आणि सामान्य आयुष्य जगता येणार नाही.
आर्थिक संकट
मी खाद्य उद्योगातील उत्पादन विभागात काम करतो. आतापर्यंत मी माझी सगळी बचत खर्च केली आहे, तसेच उपचारांसाठी कर्जही घेतलं आहे. पण आता या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी लागणारा खर्च माझ्या आवाक्याबाहेर आहे — यासाठी अजून ₹२५,००,००० आवश्यक आहेत.
वडिल म्हणून माझी एकच इच्छा आहे – माझी मुलगी मोठी व्हावी, शाळेत जावी, धावावी, खेळावी आणि तिचं बालपण उपभोगावं. पण तुमच्या मदतीशिवाय हा स्वप्न पूर्ण होणं शक्य नाही.
🙏 तुम्ही कशी मदत करू शकता
तुमचं योगदान कितीही लहान असलं तरी ते तानिशाचं आयुष्य वाचवण्याच्या दिशेने आम्हाला एक पाऊल पुढे नेईल. प्रत्येक रुपया थेट तिच्या उपचारासाठी वापरला जाणार आहे.
कृपया आपल्या अंत:करणातून मदत करा आणि माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचं हास्य परत आणा. आपण सगळे मिळून तिला वाचवू शकतो.
आपल्या दयाळूपणाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार.
कृतज्ञ,
नितीन तात्या कांबळे
(तानिशाचे वडील)
----------------------------------------------------------------------
The goal amount of the campaign may be higher than the attached estimates to address and aid the post-hospitalization expenses/contingencies including but not limited to prolonged medication, diagnostics, rehabilitation therapies, and follow-up doctor visits/consultations which vary from disease to disease.